याकोब 2:17-18
याकोब 2:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.
याकोब 2:17-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे, नुसत्या विश्वासाला, जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे. पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.” तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव, आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.
याकोब 2:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, “तुझ्या ठायी विश्वास आहे, आणि मला क्रिया आहेत.” क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन.
याकोब 2:17-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, एका माणसाकडे विश्वास आहे आणि दुसरा मनुष्य कृती करतो. माझे उत्तर असे आहे, कोणताही मनुष्य कृतीविना विश्वास कसा ठेवू शकतो, हे मला दाखवा. मी माझा विश्वास माझ्या कृतीद्वारे तुम्हांला दाखवीन.