याकोब 1:25-27
याकोब 1:25-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल. जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
याकोब 1:25-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो. जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवतात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
याकोब 1:25-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.
याकोब 1:25-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून त्यांचे पालन करण्यात टिकून राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात देवाचा आशीर्वाद मिळतो. आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.