याकोब 1:14-18
याकोब 1:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
याकोब 1:14-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वतःच्या दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो. मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली, म्हणजे पाप मरणास जन्म देते. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका. प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचा पिता जो छायेसारखा बदलत नाही त्याच्यापासून येते. त्याने आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्याने जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.
याकोब 1:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका; प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.
याकोब 1:14-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला.