याकोब 1:14-16
याकोब 1:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:14-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वतःच्या दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो. मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली, म्हणजे पाप मरणास जन्म देते. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका
सामायिक करा
याकोब 1 वाचा