यशया 65:20-25 - Compare All Versions
यशया 65:20-25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ, किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल. शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल. “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.” एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील. ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत. त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन. लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
यशया 65:20-25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यापुढे तान्ही बाळे कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास तो शापित समजल्या जाईल. त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील. त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील, किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही, कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल, तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील; माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ सुखाने बहुतकाळ उपभोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. कारण ते लोक आणि त्यांचे वंशज याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील. मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन. लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.
यशया 65:20-25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.