यशया 6:6-8
यशया 6:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता. त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले, “बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे.” मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”
सामायिक करा
यशया 6 वाचायशया 6:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.” तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”
सामायिक करा
यशया 6 वाचा