YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 6:1-8

यशया 6:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते. त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे. प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.” जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले. तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.” मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता. त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले, “बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे.” मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”

सामायिक करा
यशया 6 वाचा

यशया 6:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1 घोषणा करणार्‍यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!” मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.” तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”

सामायिक करा
यशया 6 वाचा