यशया 52:7-10
यशया 52:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी जो घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत. तुझ्या पाहारेकऱ्यांचा उंचावलेला आवाज ऐक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत. कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वरास सियोनेला परत येताना पाहिले आहे. यरूशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरूशलेमेला खंडूण घेतले आहे. परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे. सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहील.
यशया 52:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पर्वतावरून शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!” ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील. यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे. याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.
यशया 52:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत; कारण परमेश्वर सीयोनेस परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत. यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे. परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.