यशया 50:4-9
यशया 50:4-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणार्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; त्यांना कसर खाऊन टाकील.
यशया 50:4-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही. मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या. पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.
यशया 50:4-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात. सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत; मी बंडखोर नव्हतो, मी मागे फिरलो नाही. जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे. मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा! सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.