YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 48:1-11

यशया 48:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे. ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे. “मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या. तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते. म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’ तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो. त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’ तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते. माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले. मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.

सामायिक करा
यशया 48 वाचा

यशया 48:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही. कारण ते स्वत:ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर “मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या. कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे. यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.” तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत. या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही. त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस. पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही. पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे. माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.

सामायिक करा
यशया 48 वाचा

यशया 48:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे— पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता आणि इस्राएलाच्या परमेश्वरावर अवलंबून असल्याची फुशारकी मारता— ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे: भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले. तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत. याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’ ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो. त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे; आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत. तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’ तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत; पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत. कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात; जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले. तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही. पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली. तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.