यशया 43:8-9
यशया 43:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण. सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत. त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांचे घोषणा करील? त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत, त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे.
यशया 43:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे डोळे असून अंध आहेत, जे कान असून बहिरे आहेत, अशांना बाहेर काढ. सर्व राष्ट्रे एकत्र येतात आणि सर्व लोक एकजूट होतात. त्यांच्या कोणत्या मूर्तींनी हे भाकीत केले होते आणि भावी गोष्टी आम्हाला घोषित केल्या? त्या सत्य बोलल्या तर त्याचे साक्षीदार त्यांनी आणावे, जेणेकरून ऐकणारे म्हणतील, “हे न्याय्य आहे.”
यशया 43:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
डोळे असून आंधळे, कान असून बहिरे अशा लोकांना घेऊन या! सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.