यशया 41:1-10
यशया 41:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ. पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले. तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात. ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे. द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात. प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर. तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.” परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना, मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
यशया 41:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू. ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो. तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो. हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्यांनाही तो मीच आहे. द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली. त्यांतील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला साहाय्य केले, प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, “हिंमत धर.” ओतार्याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्याने ऐरणीवर घण मारणार्याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली. माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”; तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.