YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यश. 41:1-10

यश. 41:1-10 IRVMAR

अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ. पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले. तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात. ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे. द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात. प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर. तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.” परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना, मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.

यश. 41 वाचा

ऐका यश. 41