यशया 36:4-22
यशया 36:4-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, ‘हा तुझा भरवसा कसला? मी म्हणतो, तुझा युद्धसंकल्प व तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत; तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात. त्या सर्वांना जर तू असे म्हणशील की, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला होता की ह्या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव? आता माझा धनी अश्शूरचा राजा ह्याच्याशी पैज लाव; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो. माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लावशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिसरावर भिस्त ठेवतोस ना? मी ह्या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले आहे की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.”’ मग एल्याकीम, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.” रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?” मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “लोकहो, राजाधिराज अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, “हिज्कीयास तुम्हांला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा बचाव व्हायचा नाही. ‘परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही,’ असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो.” हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या; पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षींच्या मळ्यांचा देश ह्यात तुम्हांला नेईन. ‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय? हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय? ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’ ह्यावर ते गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण ‘तुम्ही त्याला उत्तर देऊ नये’ अशी राजाची त्यांना ताकीद होती. मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.
यशया 36:4-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे? तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो? पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.” पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?” तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर. माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता? तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर. मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नका.” पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?” नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.” राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही. परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.” हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या टाकीतले पाणी प्या. मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा. परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय? हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय? ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय? पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती. नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.
यशया 36:4-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस? तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस? पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते. पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय?” “ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तुमच्याकडे त्यांच्यासाठी तेवढे घोडेस्वार असतील तर! रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार? शिवाय, मी याहवेहशिवाय या भूमीवर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशाविरुद्ध चाल करून येण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ” तेव्हा एल्याकीम, शेबना आणि योवाह सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.” परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?” मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरचे महाराज यांचे ऐका! महाराज असे म्हणतात: हिज्कीयाहास तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका, जेव्हा तो म्हणेल, ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवितील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे महराज असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल, जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या देशात घेऊन जाईपर्यंत. “हिज्कीयाहला तुमची दिशाभूल करू देऊ नका जेव्हा म्हणतो की, ‘याहवेह आम्हाला सोडवतील.’ कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईमची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय? या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्यांच्या देशांना माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?” परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.” यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.