यशया 33:1-6
यशया 33:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरे लुटार्या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो. कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली. टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील. परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे. तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.
यशया 33:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही! अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो! जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील, जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो. मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली. टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील. परमेश्वर उंचावला आहे. तो उच्चस्थानी राहतो. त्याने सियोनेस प्रामाणिकपणा व चांगुलपणा यांनी भरले आहे. तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.
यशया 33:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल. हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा. तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात. जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते. अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे. टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात. याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात; सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील. तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील, तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील; याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे.