YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 33:1-6

यशायाह 33:1-6 MRCV

हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल. हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा. तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात. जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते. अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे. टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात. याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात; सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील. तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील, तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील; याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे.

यशायाह 33 वाचा