यशया 30:20-21
यशया 30:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील. जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
यशया 30:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.”
यशया 30:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रभू तुम्हांला भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी ह्यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. “हाच मार्ग आहे; ह्याने चला,” अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हांला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो.