इब्री 6:19-20
इब्री 6:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे.
इब्री 6:19-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्हाला ही आशा जीवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे. जेथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा प्रमुख याजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे.
इब्री 6:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे. ‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.
इब्री 6:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे. तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे.