YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 6:1-20

इब्री 6:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्‍चात्ताप, देवावरचा विश्वास, आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या. देव होऊ देईल तर हे आपण करू. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्‍या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्‍चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्‍यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटेकुसळे उपजवते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट जाळण्यात आहे. जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की, “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणांपेक्षा मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे. ‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.

सामायिक करा
इब्री 6 वाचा

इब्री 6:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चात्ताप, बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण, या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. देव होऊ देईल तर हे आपण करू. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात. कारण जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो. पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल. प्रियजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हास सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हास अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही. पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे. जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली. तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईनच आणि मी तुझ्या वंशजांना महान रीतीने बहुगुणित करीनच करीन.” म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्यास दिले होते ते त्यास प्राप्त झाले. लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटवणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते. आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे. आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे.

सामायिक करा
इब्री 6 वाचा

इब्री 6:1-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांचा पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या. शुद्धतेच्या प्रथांबाबत, बाप्तिस्म्यांविषयी, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्याय अशा विषयांचा पाया पुन्हा घालू नका. आणि परमेश्वर होऊ देतील, तर आपण तसेच करू. ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले, ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या थोर सामर्थ्याचा अनुभव घेतला, जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे. जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा अंत जळण्यात होईल. जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींची खात्री आहे. कारण परमेश्वर अन्यायी नाही. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत. आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल. तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत. जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून, म्हणाले की, “मी तुला खात्रीने आशीर्वाद देईन आणि तुला अनेक संतान देईन.” मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले. लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची शपथ वाहतात, आणि शपथ जे काही म्हटले आहे त्याचे समर्थन करते आणि सर्व वादांचा शेवट करते. कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला. परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे, व जे आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे. आम्हाला ही आशा जीवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे. जेथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा प्रमुख याजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे.

सामायिक करा
इब्री 6 वाचा

इब्री 6:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे, बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये. आपण पुढे जाऊ या. परमेश्वर होऊ देईल तर हे आपण करू या. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, त्यांचे जर पतन झाले, तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने क्रुसावर खिळतात व त्याचा उघड-उघड अपमान करतात. जी जमीन आपल्यावर वारंवार पडलेला पाऊस शोषून घेते व लागवड करणाऱ्याला उपयोगी असे पीक देते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो; पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल. जरी आम्ही असे बोललो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या म्हणजे तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे. तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी. म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्यायोगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे ठरतात त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे व्हावे. देवाने अब्राहामला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी थोर नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले, मी तुला निश्चित आशीर्वाद देईन व तुला निश्चित बहुगुणित करीन. त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देवाने शपथेद्वारे हमी दिली, ह्यासाठी की, आपणापुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करून घेण्याकरिता आपण देवाचा आश्रय घेतला असल्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टींमुळे उत्तेजन मिळावे:अभिवचन आणि शपथ ह्या दोन गोष्टी न बदलणाऱ्या असून त्यांच्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे. आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे. तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे.

सामायिक करा
इब्री 6 वाचा