इब्री 4:14-15
इब्री 4:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या. कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
इब्री 4:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, स्वर्गातून पार गेलेले गेलेला परमेश्वराचे पुत्र येशू असे महान प्रमुख याजक आपणास आहे, म्हणून आम्ही विश्वासाचा पत्कर केलेला आहे तो दृढ धरून ठेऊ या. ते असे प्रमुख याजक नाही जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु आपल्याला असे आहे जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.
इब्री 4:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.
इब्री 4:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला देण्यात आलेला आहे, म्हणून आपण जी श्रद्धा स्वीकारली आहे ती दृढ धरून राहू या. आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.