इब्री 12:14-17
इब्री 12:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये, कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
इब्री 12:14-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणालाही प्रभुला पाहता येत नाही. परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, दक्ष असा की ज्यामुळे पुष्कळ जण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठपणाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या. तुम्हाला माहीत आहे की, त्यानंतर तो हे ज्येष्ठपणाचा आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असतानाही त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही त्याने केले होते ते त्याला बदलता आले नाही.
इब्री 12:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’ देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या. तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाही.
इब्री 12:14-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा; देवाच्या कृपेकडे पाठ फिरवू नका. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कटुतेचे मूळ अंकुरित झाल्यावर उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावसारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या. तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असताही त्याला नकार मिळाला. त्याने जरी अश्रू ढाळून पश्चात्ताप करायची संधी शोधली, तरी ती त्याला मिळाली नाही.