इब्री 10:32-34
इब्री 10:32-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली. काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
इब्री 10:32-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. बंदीवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि तुम्हाला स्वतःची अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.
इब्री 10:32-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.
इब्री 10:32-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली. बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.