YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:20-24

इब्री 10:19-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे; आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.

सामायिक करा
इब्री 10 वाचा

इब्री 10:20-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे. आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.

सामायिक करा
इब्री 10 वाचा

इब्री 10:19-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्‍वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे. आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे; म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे. आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या.

सामायिक करा
इब्री 10 वाचा