हबक्कूक 3:16-18
हबक्कूक 3:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे. जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली, तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
हबक्कूक 3:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन. अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत, तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.
हबक्कूक 3:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन.