YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 5:1-5

उत्पत्ती 5:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला. त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले. आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.

सामायिक करा
उत्पत्ती 5 वाचा

उत्पत्ती 5:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले. आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

सामायिक करा
उत्पत्ती 5 वाचा