आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला; त्याने त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला; त्यांना उत्पन्न केले त्या वेळी त्यांना आदाम (मानव) हे नाव दिले. आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ ठेवले; शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.
उत्पत्ती 5 वाचा
ऐका उत्पत्ती 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 5:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ