उत्पत्ती 49:29-33
उत्पत्ती 49:29-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे, ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले. अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.” आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.
उत्पत्ती 49:29-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे. तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली. ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.” आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.
उत्पत्ती 49:29-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने त्यांना आज्ञा केली की, “मी आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांजवळ पुरा. कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही. तेथेच अब्राहाम व त्याची स्त्री सारा ह्यांना पुरले; इसहाक व त्याची स्त्री रिबका ह्यांनाही तेथे पुरले; तेथेच मी लेआलाही पुरले. ते शेत व त्यांतील गुहा ही हेथींकडून खरेदी केली आहेत.” आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपवल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.