उत्पत्ती 30:20-24
उत्पत्ती 30:20-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा लेआ म्हणाली, “देवाने मला चांगले आंदण दिले आहे; ह्या खेपेस माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी सहा मुलगे झाले आहेत;” म्हणून तिने त्याचे नाव ‘जबुलून’ ठेवले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने ‘दीना’ ठेवले. मग देवाने राहेलीची आठवण केली; आणि त्याने तिचे गार्हाणे ऐकून तिची कूस वाहती केली. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ती म्हणाली, “देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘योसेफ’ ठेवून म्हटले, “परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देवो!”
उत्पत्ती 30:20-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून ठेवले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले. मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली. ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.” तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”