YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 25:1-18

उत्पत्ती 25:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते. तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली. यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते. एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला. अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला. इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले. अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा. ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले. ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला. त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते.

सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचा

उत्पत्ती 25:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अब्राहामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटूरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले. पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे एकशे पंचाहत्तर होती. अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले. हे शेत अब्राहामाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहाम व त्याची बायको सारा ह्यांना पुरले. अब्राहामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इसहाक ह्याला देवाने आशीर्वादित केले; इसहाक हा त्या वेळी लहाय-रोई विहिरीजवळ राहत असे. सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही : इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत : नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा हे इश्माएलचे मुलगे; त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यांना पडलेली ही नावे. हे आपापल्या वंशाचे बारा सरदार होते. इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले; हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो; ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचा