YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 21:22-34

उत्पत्ती 21:22-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे अब्राहामाला म्हणाले, “जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे. तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा : मी तुमच्याशी, तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन.” अब्राहाम म्हणाला, “बरे, अशी शपथ मी वाहतो.” मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला. अबीमलेख म्हणाला, “हे कोणी केले हे मला ठाऊक नाही; तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते; आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले.” मग अब्राहामाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखाला दिले आणि त्या दोघांनी एकमेकांत करार केला. अब्राहामाने कळपातील कोकरांतल्या सात माद्या वेगळ्या काढून ठेवल्या. तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला?” तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली. बैर-शेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे निघून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली. अब्राहाम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरा म्हणून राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 21 वाचा

उत्पत्ती 21:22-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे; म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.” आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.” मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली. अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.” म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला. अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली. अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?” त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.” तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले. त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली. अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 21 वाचा

उत्पत्ती 21:22-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात. तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.” अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.” “पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली. “हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?” मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला. पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या, तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?” यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.” म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता. बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले. अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली. आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.