गलतीकरांस पत्र 4:20-21
गलतीकरांस पत्र 4:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा.
गलतीकरांस पत्र 4:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आताच मी तेथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे. मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का?
गलतीकरांस पत्र 4:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.
गलतीकरांस पत्र 4:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते, तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी चिंताग्रस्त झालो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.