यहेज्केल 37:1-11
यहेज्केल 37:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती. मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.” मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल. मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.” म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली. मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता. मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.” मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.
यहेज्केल 37:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.” तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.” मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला; मी संदेश देत असता आवाज झाला; आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, “वार्याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.” मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’