यहेज्केल 26:15-21
यहेज्केल 26:15-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रभू परमेश्वर सोरेस म्हणतो, तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी झालेल्यांच्या कण्हण्याने, तुझ्यामध्ये चाललेल्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप होणार नाही का? तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील; ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील, क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझ्याविषयी ते विस्मय पावतील. ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस! तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे! तुझ्या निघून जाण्याने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत.’ प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझ्यावर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन, तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन. लोकांना दहशत पडेल असा तुझा मी विध्वंस करीन, तू नाहीशी होशील; तुझा शोध करतील तरी तू कधीही सापडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
यहेज्केल 26:15-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधःपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कण्हण्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का? कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील. ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस? आता, तुझ्या पडण्याच्या दिवशी, समुद्रकिनारीचा देशांचा भीतीने थरकाप उडेल. समुद्र किनाऱ्यावरील देश भयभीत झाले आहेत, कारण तू पाण्यात गेली आहेस.” कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जी नगरे वसली नाहीत त्यासारखे जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि तेव्हा प्रचंड जले तुला झाकतील. मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस. मी तुझ्यावर विपत्ती आणिन आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
यहेज्केल 26:15-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“सोर शहरास सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यात होत असलेल्या कत्तलीमुळे समुद्रतटांचा थरकाप होणार नाही काय? तेव्हा सर्व समुद्रतटाचे राजकुमार आपआपल्या राजासनांवरून खाली उतरतील आणि आपले झगे काढून बाजूला ठेवतील व आपली नक्षीदार वस्त्रे काढून टाकतील. भीतीची वस्त्रे घालून, प्रत्येक क्षणी थरथर कापत, तुझ्याविषयी भयभीत होऊन ते जमिनीवर बसतील. मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला. आता तुझ्या पतनाच्या दिवशी समुद्रतट कापतात; तू कोसळून पडली म्हणून समुद्रातील द्वीपे भयभीत झाली आहेत.’ “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यामध्ये कोणी आणखी वस्ती करीत नाही, अशा शहरांसारखे जेव्हा मी तुला ओसाड शहर करेन आणि जेव्हा मी खोल समुद्र तुझ्यावर आणेन आणि त्याचे प्रचंड पाणी तुला झाकून टाकेल, आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत अशा ठिकाणी मी तुला वसवीन. मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”