यहेज्केल 26:1-14
यहेज्केल 26:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे : “मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’ ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन. ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करीन. ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल; मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो; लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल. तिच्या भूप्रदेशात असलेल्या तिच्या कन्या तलवारीने ठार होतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन. भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यांना तो तलवारीने वधील; तो तुझ्याविरुद्ध बुरूज बांधील, मोर्चा रचील व तुझ्याविरुद्ध ढालींचा कोट उभारील. तो तुझ्या तटांना आपली आघातयंत्रे लावील, आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज पाडून टाकील. त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ ह्यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील. तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवील; तो तुझे लोक तलवारीने ठार मारील, तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील. ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील. मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही. मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन; तुला पुन्हा बांधणार नाहीत; मी परमेश्वराने हे म्हटले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
यहेज्केल 26:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि असे झाले की, बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, “मानवाच्या मुला, कारण सोर यरूशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल.” म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.” ते सोरेच्या तटाचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची धूळ झाडून दूर करीन आणि तिला उघडा खडक करीन. ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल. तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वधल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे. तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरूद्ध उतरती वेढ्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरूद्ध ढाल उभारील. तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील. घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील. तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवितील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमीनीवर पडतील. याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील. कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्यांचा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही. कारण मी तुला उघडा खडक करीन, तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील, तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी, परमेश्वराने असे म्हटले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
यहेज्केल 26:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाराव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’ यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन. ते सोरचे तट पाडतील व तिच्या बुरुजांचा विध्वंस करतील; मी तिची माती खरडून काढेन व तिला एक उघडा खडक करेन. ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल, आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन. भूप्रदेशात असलेल्या तुमच्या वस्त्यांचा तलवारीने तो नाश करेल; तो तुमच्याविरुद्ध घेराबंदी करेल, तुमच्या भिंतीस चढ बांधेल आणि तुझ्याविरुद्ध त्याची ढाल उंच करेल. तो तुझ्या तटांसमोर युद्धाची यंत्रे लावेल व आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज नष्ट करेल. त्याचे घोडे इतके असतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकला जाशील. युद्धाचे घोडे, गाडे व रथासह तो जेव्हा तुझ्या द्वारातून प्रवेश करेल आणि ज्या शहराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यातून त्याचे सैन्य प्रवेश करतील तेव्हा तुझ्या भिंती त्यांच्या मोठ्या आवाजाने थरकापतील. त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी तुझे सर्व रस्ते तुडविले जातील; तो तुझ्या लोकांना तलवारीने मारेल आणि तुझे मजबूत स्तंभ जमिनीवर पडतील. ते तुझी संपत्ती व व्यापारी वस्तू लुटून घेतील; ते तुझ्या भिंती फोडतील आणि तुझ्यातील सुंदर घरांचा ते नाश करतील व तुझे धोंडे, लाकूड व माती समुद्रात फेकतील. तुझ्या गीतांचा आवाज मी बंद पाडेन आणि तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही. मी तुला उघडे खडक बनवीन आणि तू मासेमारीचे जाळे पसरविण्याचे ठिकाण बनशील. तू कधीही पुनर्स्थापित होणार नाहीस, कारण मी याहवेह हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.