यहेज्केल 24:1-14
यहेज्केल 24:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दशमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू ही तारीख, आजची तारीख लिहून ठेव; ह्या तारखेस बाबेलचा राजा यरुशलेमेवर जाऊन पडला आहे. ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत. मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक; तिच्यात निवडक हाडे भर. कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे; हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांची रास कर; ते चांगले शिजू दे; त्यातील हाडेही चांगली शिजू दे. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत. कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे; धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही. संताप येऊन सूड उगवावा ह्यासाठी तिने रक्त पाडले आहे, ते झाकता येऊ नये म्हणून ते उघड्या खडकावर पडावे असे मी केले आहे. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! मी सरपणाचा ढीगही मोठा करीन. लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटव, मांस चांगले शिजव, रस्सा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ. मग विस्तवावर कढई रिकामीच ठेव म्हणजे तिचे पितळ तप्त व धगधगीत होऊन तिचा मळ आतल्याआत जळेल, तिचा गंज निघून जाईल. ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका. तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस. मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
यहेज्केल 24:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाबेलातील बंदिवासाच्या नवव्या वर्षी पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणाला, “मानवाच्या मुला, तुझ्यासाठी आजचा दिवस आणि तारीख लिहून ठेव, याच दिवशी बाबेलचा राजा येऊन यरूशलेमेला वेढा देईल. आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत. मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्यामध्ये हाडे टाकून भरणा कर. कळपातले चांगले कोकरु घे, हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांचा जाळ कर, त्यांना चांगले शिजू दे त्यातील हाडांनाही शिजू दे. यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असो, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे; त्याचा गंज निघत नाही, त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही. तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही. म्हणून संतापाच्या त्वेषाने मी तिचे रक्त खडकावर सांडले जमीनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही. यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असो, मी जळणासाठी लाकडाचा मोठा साठा करीन. लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतूत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत. मग अग्नीवर भांडे रिकामेच असू दे अशासाठी की त्यातील गाळ तप्त अग्नीने जळून जाईल. ती कष्टाने खूप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती. तुझा लज्जास्पद स्वभाव हा तुझ्या अशुद्धतेत आहे, कारण मी तुला शुद्ध करु पाहिले तरी पण तू शुद्ध झालीच नाही व अशुद्धच राहिल्याने माझा त्वेष तुझ्यावर आला आहे. मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
यहेज्केल 24:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला. या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव आणि त्यात पाणी ओत. त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर; कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे. हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव; आणि ते उकळून त्यात हाडे शिजव. “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो, ज्या कढईला गंज लागला आहे, ज्याचा थर जाणार नाही! जसे काढता येईल तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या. “ ‘कारण तिने सांडलेले रक्त तिच्यामध्येच आहे: ते तिने उघड्या खडकावर ओतले; तिने ते मातीने झाकले जाईल असे, जमिनीवर ओतले नाही. कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन, म्हणजे ते झाकले जाणार नाही. “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो! मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन. तर लाकडाचा ढीग करा आणि अग्नी पेटवा. मसाले मिसळून; मास चांगले शिजवून घ्या, हाडे पूर्णपणे जळू द्या. मग रिकामी कढई निखार्यावर ठेवा ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या, म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल. परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, तो अग्नीने देखील निघाला नाही. “ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”