यहेज्केल 23:1-39
यहेज्केल 23:1-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले ते असे : “मानवपुत्रा, दोन स्त्रिया होत्या, त्या एकाच मातेच्या कन्या होत्या; त्यांनी मिसर देशात व्यभिचार केला; त्यांनी आपल्या तारुण्यात व्यभिचार केला; तेथे त्यांची स्तने मर्दण्यात आली; पुरुषांनी त्यांच्या कौमार्यावस्थेतील त्यांची स्तनाग्रे चुरली. त्यांतल्या थोरलीचे नाव अहला होते व तिच्या बहिणीचे नाव अहलीबा होते; त्या माझ्या झाल्या आणि त्यांना पुत्र व कन्या झाल्या. त्यांची नावे पाहिली असता अहला (तिचा डेरा) म्हणजे शोमरोन व अहलीबा (माझा डेरा तिच्या ठायी आहे) म्हणजे यरुशलेम. अहला माझी असतां तिने शिंदळकी केली; ती आपले जार, आपले शेजारी अश्शूरी ह्यांच्यावर आसक्त झाली; ते निळी वस्त्रे धारण करणारे होते, ते अधिपती व नायब अधिपती होते, ते सगळे मनोहर व तरुण असून शिलेदार होते. ते सगळे निवडक अश्शूरी पुरुष असून त्यांच्याबरोबर ती शिंदळकी करू लागली आणि ज्या सर्वांवर ती आसक्त झाली त्यांच्या सर्व मूर्तींनी ती भ्रष्ट झाली. मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला. ह्यामुळे मी तिला तिच्या जारांच्या स्वाधीन केले, ज्या अश्शूरी पुरुषांवर ती आसक्त झाली होती त्यांच्या हाती तिला दिले. त्यांनी तिला नग्न केले, तिचे पुत्र व कन्या ह्यांचे हरण केले, आणि तिला तलवारीने मारून टाकले; तिचे नाव स्त्रियांच्या तोंडी झाले; कारण त्यांनी तिला शासन केले. तिची बहीण अहलीबा हिने हे पाहिले तरी तिच्यापेक्षाही तिची विषयासक्ती वाढली; तिने आपल्या बहिणीपेक्षा अधिक व्यभिचार केला. शेजारचे अश्शूरी पुरुष अधिपती व नायब अधिपती, व उंची वस्त्रे ल्यालेले शिलेदार होते; त्या सर्व मनोहर तरुणांवर ती आसक्त झाली. मी पाहिले की तीही भ्रष्ट झाली; त्या दोघींचे वर्तन सारखेच होते. तिने आपल्या व्यभिचाराचे क्षेत्र वाढवले; तिने भिंतीवर रेखलेली पुरुषांची चित्रे पाहिली, ती हिंगुळाने रेखलेली खास्द्यांची चित्रे होती; त्याच्या कंबरांना पट्टे असून डोक्यात उंची व रंगीत पागोटी होती; ते सर्व पुरुष वीरांप्रमाणे दिसत असून त्यांची ढब खास्दी देशातील बाबेलच्या पुरुषांप्रमाणे होती. तिची नजर त्यांच्यावर गेली तेव्हा ती त्यांच्यावर आसक्त झाली व तिने त्यांना बोलावून आणण्यास खास्दी देशात जासूद पाठवले. तेव्हा बाबेलचे पुरुष तिच्या शृंगारलेल्या पलंगावर तिच्याजवळ गेले; त्यांनी तिच्याबरोबर व्यभिचार करून तिला भ्रष्ट केले; त्यांच्या समागमाने ती भ्रष्ट झाली, तेव्हा तिने आपले मन त्यांच्यावरून काढले. असा तिने आपला व्यभिचार मांडला व आपली काया उघडी केली; तेव्हा जसे तिच्या बहिणीवरून माझे मन उडाले होते तसे तिच्यावरूनही उडाले. तरी तिने आपल्या तारुण्यात मिसर देशात वेश्यावृत्ती चालवली होती. तिची तिला आठवण होऊन तिने आपला व्यभिचार अधिकच वाढवला. ती आपल्या जारांवर आसक्त झाली; त्यांचे अवयव तर गाढवाच्या अवयवांसारखे होते व त्यांचा माज घोड्यांच्या माजासारखा होता. ह्या प्रकारे तुझ्या तारुण्यात मिसरी पुरुष तुझी कौमार्यदशेतील स्तनाग्रे चुरीत तेव्हाच्या शिंदळकीची तू आठवण केलीस.” ह्यामुळे अगे अहलीबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, ज्या तुझ्या जारांवरून तुझे मन उडाले आहे त्यांना मी तुझ्याविरुद्ध उठवीन त्यांना तुझ्यावरून चोहोकडून आणीन; बाबेलचे पुरुष, सर्व खास्दी, पकोड, शोआ व कोआ येथले लोक व अश्शूरी पुरुष, जे सर्व मनोहर तरुण, अधिपती व नायब अधिपती, वीर व मंत्री व शिलेदार आहेत; त्यांना तुझ्यावर आणीन. ते शस्त्रे, रथ, चाकांची वाहने, निरनिराळ्या लोकांचा दळभार घेऊन तुझ्यावर येतील; ते कवचे, ढाली व शिरस्त्राणे धारण करून तुला चोहोंकडून घेरतील; मी न्याय करण्याचे काम त्यांना सोपवून देईन, म्हणजे ते आपल्या कायद्यांना अनुसरून न्याय करतील. मी तुझ्यावर माझी ईर्ष्या रोखीन म्हणजे ते संतापून तुझा समाचार घेतील; ते तुझे नाक व कान कापून टाकतील; तुझी अवशिष्ट माणसे तलवारीने पडतील; ते तुझ्या कन्या व पुत्र हरण करतील, तुझी अवशिष्ट माणसे अग्नीने भस्म होतील. ते तुझी वस्त्रे हरण करतील, तुझे उत्कृष्ट जवाहीर हिसकावून घेतील. अशी तुझी शिंदळकीची खोड, मिसर देशात तुला लागलेली व्यभिचाराची चट, मी मोडीन, म्हणजे तू त्यांच्याकडे पुन्हा ढुंकून पाहणार नाहीस व मिसर देशाचे स्मरण तू ह्यापुढे करणार नाहीस. प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्यांचा तू द्वेष करतेस त्यांच्या स्वाधीन तुला मी करीन, ज्यांच्यावरून तुझे मन उडाले आहे त्यांच्या हाती तुला देईन; ते द्वेषाने तुझा समाचार घेतील, ते तुझी सर्व मालमत्ता हरण करून तुला नागवीउघडी करतील; अशाने तुझ्या शिंदळचाळ्यांची, तुझ्या कामासक्तीची व तुझ्या व्यभिचाराची लाज उघडी पडेल. तू व्यभिचार करण्यासाठी अन्य राष्ट्रांच्या मागे लागलीस व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळलेस म्हणून हे सर्व तुला प्राप्त होईल. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या बहिणीच्या पेल्यासारखा खोल व मोठा पेला पिशील, त्याचे माप मोठे असल्यामुळे तू हास्य व थट्टा ह्यांना पात्र होशील. तू नशा व शोक ह्यांनी व्याप्त होशील. तुझी बहीण शोमरोन हिचा पेला विस्मय व विध्वंस ह्यांचा आहे. तू तो निथळून पिशील, त्याच्या खापर्या तू कुरतडून खाशील व त्यांनी तू आपले ऊर ओरबाडशील; कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तू मला विसरली आहेस, व तू माझ्याकडे पाठ फिरवली आहेस, म्हणून तू आपल्या कामासक्तीचे व व्यभिचाराचे फळ भोग.” आणखी परमेश्वर मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा ह्यांचा न्याय करतोस ना? तर त्यांना त्यांची अमंगळ कृत्ये दाखव. कारण त्यांनी व्यभिचार केला आहे, त्यांच्या हातांना रक्त लागले आहे, त्यांनी आपल्या मूर्तींबरोबर व्यभिचार केला आहे आणि माझ्यापासून त्यांना झालेले पुत्र मूर्तींना भक्ष्य व्हावे म्हणून त्यांनी अग्नीत त्यांचे होम केले आहेत. त्यांनी आणखी माझ्याबरोबर हेही वर्तन केले आहे की, त्यांनी त्याच दिवशी माझे पवित्रस्थान अपवित्र केले आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. कारण त्यांनी आपल्या पुत्रांचा वध करून ते आपल्या मूर्तींना अर्पण केले, तेव्हा त्याच दिवशी त्या माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यासाठी त्यांत आल्या; पाहा, माझ्या मंदिरांत त्यांनी असे वर्तन केले.
यहेज्केल 23:1-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या. त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले. त्यांची नावे अहला थोरली व अहलीबा धाकटीचे नाव आहे, ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला व कन्येला जन्म दिला. त्यांच्या नावाचा अर्थ येणे प्रमाणे आहे. अहला म्हणजे, शोमरोन आणि ओहलीबा म्हणजे यरूशलेम. परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते. राजधिकाऱ्याने जांभळी वस्त्रे परिधान केली होती. जे सर्व पुरुषात बलवान व देखणे होते, त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत. तिने स्वत:ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत:ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत:ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला. तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या सोबत संभोग केला. यास्तव मी तिला तिच्या प्रियकरांच्या हाती दिले अश्शूर ज्यांनी तिच्याशी व्यभिचार केला. त्यांनी तिला नग्न केले. त्यांनी तिच्या मुला मुलींना नेऊन तलवारीने मारुन टाकले, ती स्त्रियांमध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला. तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले. अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला. मी पाहिले तिने स्वत:ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले. मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली. आपल्या कमेरेस बंद घालून रंगीबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खास्दी देशातील बाबेलाच्या अधिकाऱ्यासारखी दिसत असून आपल्या जन्मभूमित होती. जशी तिची नजर जाच्यावर गेली त्याच्याशी तिने व्यभिचार केला म्हणून तिने खास्द्यांच्या देशात निरोप्या पाठवला. मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत:ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले. तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले. मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला. तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्यभिचार केला, ज्यांचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते, व माज घोड्या सारखे होते. पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले जेव्हा मिसऱ्यांनी तिचे स्तन गोंजारले. यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन. बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन. ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील. मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील. ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील. मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही. यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू द्वेष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दूर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन. क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल. या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस. तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन. प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल. तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे. तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे. यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत:ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.” परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर, जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केला व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले. आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली. जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.
यहेज्केल 23:1-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, दोन स्त्रिया होत्या, ज्या एकाच आईच्या मुली होत्या. त्या इजिप्तमध्ये वेश्या होऊन, त्यांच्या तारुण्यापासून वेश्यावृत्ती करीत होत्या. त्या देशात त्यांची स्तने हाताळली गेली आणि त्यांच्या कुमारावस्थेतील छाती कुरवाळली गेली. थोरलीचे नाव ओहोलाह होते आणि ओहोलीबाह तिची लहान बहीण होती. त्या माझ्या होत्या आणि त्यांनी मुलांना व मुलींना जन्म दिला. ओहोलाह ही शोमरोन आहे आणि ओहोलीबाह यरुशलेम आहे. “ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली ते निळी वस्त्रे घातलेले, राज्यपाल व सेनापती होते, ते सर्व सुंदर तरुण पुरुष घोडेस्वार होते. तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले. इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या. “म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले. त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला. “तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती. ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते. मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या. “परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती, त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्यांसारखे, खास्द्यांचे रहिवासी असे दिसत होते. ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले. मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले. जेव्हा उघडपणे तिने तिची वेश्यावृत्ती केली आणि तिचे नग्न शरीर उघडे केले, तेव्हा जसे मी तिच्या बहिणीपासून झालो तसाच तिरस्काराने मी तिच्यापासून दूर झालो. तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली. तिथे ती वेश्या तिच्या प्रियकरांची वासना करू लागली, ज्यांचे जननेंद्रिय गाढवांप्रमाणे व त्यांचा स्त्राव घोड्यांसारखा होता. याप्रकारे जेव्हा इजिप्तमध्ये तुझ्या छातीला कुरवाळले गेले व तुझे तरुण स्तन हाताळले गेले, त्या तुझ्या तारुण्यातील अश्लीलतेची अभिलाषा तू धरलीस. “म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन; बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार. हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील. मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील. ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील. म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे. ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल. तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते. नशा व दुःख यांनी तू भरशील हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे. तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.” याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर. कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला. त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली.