YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 2:2-10

यहेज्केल 2:2-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो’ हे त्यांना सांग. ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता ते त्यांना समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे. हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; ही फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; त्यांच्या चर्येस भिऊ नकोस. ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक; त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस; आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा.” मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता; तो त्याने माझ्यापुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्यांविषयीचा लेख होता.

सामायिक करा
यहेज्केल 2 वाचा

यहेज्केल 2:2-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले. इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे. त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग. ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल. त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत. पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा! माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.

सामायिक करा
यहेज्केल 2 वाचा