तो माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो’ हे त्यांना सांग. ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता ते त्यांना समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे. हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; ही फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; त्यांच्या चर्येस भिऊ नकोस. ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक; त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस; आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा.” मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता; तो त्याने माझ्यापुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्यांविषयीचा लेख होता.
यहेज्केल 2 वाचा
ऐका यहेज्केल 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 2:2-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ