निर्गम 5:15-23
निर्गम 5:15-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा इस्राएल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, “आपण आपल्या दासांशी असे का वागता? आपल्या दासांना गवत देत नाहीत तरी ते आम्हांला म्हणतात, विटा करा; पाहा, आपल्या दासांना मार मिळत आहे; पण दोष आपल्या लोकांचा आहे.” तो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला यज्ञ करू द्यावा. आता जा आणि आपले काम करा; तुम्हांला गवत काही मिळायचे नाही, आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. विटा व रोजचे काम ह्यांत तुम्ही काही कमी करता कामा नये.” असे इस्राएलांच्या नायकांना बजावण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले; ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यांना आढळले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांला पाहून घेवो; फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हांला आमची किळस येईल असे केले आहे; आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे.” मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “प्रभू, तू ह्या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो ह्या लोकांना पिडीत आहे; तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस.”
निर्गम 5:15-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा? तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.” फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे. आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत. आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.” फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले; तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.” मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”
निर्गम 5:15-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता? तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.” फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’ आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.” “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले. फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले, ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.” मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का? मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”