YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 18:19-23

निर्गम 18:19-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने. तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग. तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.”

सामायिक करा
निर्गम 18 वाचा

निर्गम 18:19-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तर आता तू माझे ऐक आणि मी तुला सल्ला देतो आणि परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू परमेश्वरासमोर या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहा आणि त्यांचे वाद परमेश्वरासमोर आण. परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव. पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील. जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.”

सामायिक करा
निर्गम 18 वाचा

निर्गम 18:19-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने. विधी व नियम त्यांना शिकव. आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना दाखवत जा. तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव; त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल, आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील.”

सामायिक करा
निर्गम 18 वाचा