एस्तेर 9:29-31
एस्तेर 9:29-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती. पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा.
एस्तेर 9:29-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या दुसर्या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहाइलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहूदी ह्याने आपल्या अधिकाराने फर्मान लिहिले. त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती; ह्या पत्राचा आशय असा होता की, पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहूदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा.