एस्तेर 5:4-5
एस्तेर 5:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.” तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
एस्तेर 5:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.” “जा, हामानाला लगेच घेऊन या.” राजा म्हणाला, “म्हणजे एस्तेर जे सांगते ते करता येईल.” मग राजा व हामान एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला गेले.
एस्तेर 5:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.” राजा म्हणाला, “जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू.” मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले.