एस्तेर 5:1-2
एस्तेर 5:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तिसर्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.
एस्तेर 5:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता. त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
एस्तेर 5:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग तिसऱ्या दिवशी एस्तेरने तिची शाही वस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतील अंगणात, राजदरबाराच्या अगदी समोर, जाऊन उभी राहिली. राजा राजदरबारात आपल्या राजासनावर, प्रवेशद्वाराच्या सन्मुख बसला होता. जेव्हा त्याने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तिला बघून तो प्रसन्न झाला, तेव्हा त्याने आपला सोन्याचा राजदंड तिच्या दिशेने पुढे करून तिचे स्वागत केले, म्हणून एस्तेर जवळ गेली आणि तिने राजदंडाच्या टोकास स्पर्श केला.