YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 4:13-17

एस्तेर 4:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस. तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.” तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले: “जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले.” तेव्हा मर्दखय निघून गेला आणि एस्तेरने त्यास जे करायला सांगितले तसे त्याने केले.

सामायिक करा
एस्तेर 4 वाचा

एस्तेर 4:13-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील. अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्‍या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?” तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले: “जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.” तेव्हा मर्दखया तिथून गेला व एस्तेरच्या सूचनेप्रमाणे सर्व त्याने केले.

सामायिक करा
एस्तेर 4 वाचा

एस्तेर 4:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्‍या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?” मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की, “जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.” मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.

सामायिक करा
एस्तेर 4 वाचा

YouVersion तुमच्या अनुभवाला वैयक्तिकृत करण्यासाठी कुकीज वापरते. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही आमच्या कुकीजचा वापर करता आमच्या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे