इफिसकरांस पत्र 5:26-27
इफिसकरांस पत्र 5:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
इफिसकरांस पत्र 5:26-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; आणि एक निष्कलंक व सुरकुतलेली नसून, सर्व दोषरहित, पवित्र व गौरवशाली अशी मंडळी त्यांना सादर केली जावी.
इफिसकरांस पत्र 5:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.
इफिसकरांस पत्र 5:26-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा.