इफिसकरांस पत्र 5:15-18
इफिसकरांस पत्र 5:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा
इफिसकरांस पत्र 5:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा
इफिसकरांस पत्र 5:15-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. मुर्खासारखे वागू नका, तर प्रभुची इच्छा काय आहे ते समजून घ्या. मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.
इफिसकरांस पत्र 5:15-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत. तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे, हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा.