उपदेशक 1:13-18
उपदेशक 1:13-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत. ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय. जे वाकडे आहे ते सरळ होत नाही; जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही. मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.” ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय. कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.
उपदेशक 1:13-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत. भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे. जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही! जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही! मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.” याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो. कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो.
उपदेशक 1:13-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे! सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत. जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; जी उणीव आहे, ती मोजता येत नाही. मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.” मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्याचा पाठलाग केल्यासारखे आहे. कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.