YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 1:13-18

उपदेशक 1:13-18 MRCV

आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे! सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्‍यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत. जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; जी उणीव आहे, ती मोजता येत नाही. मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.” मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे. कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.

उपदेशक 1 वाचा