अनुवाद 6:4-8
अनुवाद 6:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव.
अनुवाद 6:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
अनुवाद 6:4-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत. याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा. या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.