अनुवाद 30:15-16
अनुवाद 30:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ रहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
सामायिक करा
अनुवाद 30 वाचाअनुवाद 30:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही आज्ञा आज मी तुला देत आहे; म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल
सामायिक करा
अनुवाद 30 वाचा